@mieknathshinde - Twitter Profile Analysis

Analysis of 200 tweets by Eknath Shinde - एकनाथ शिंदे, from 24 Jul 2022 to 09 Aug 2022.

@mieknathshinde twitter profile photo

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

verified twitter profile @mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State


7,946 tweets
741,222 followers
2,610 favourites
13 tweets per day
2014 since
77 following
238 listed
Maharashtra, India location

Top Tweets by @mieknathshinde

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.
09 Aug, 2022 - 04:48 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात आपल्या जीवावर उदार होऊन लढलेल्या तसेच प्रसंगी बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन... #AugustKrantiDin
09 Aug, 2022 - 04:25 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
आपल्या पारंपारिक कलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या देशातील विविध राज्यातील आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... #जागतिक_आदिवासी_गौरव_दिन
09 Aug, 2022 - 04:21 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात उपस्थित राहून भगवान शिवशंकराची मनोभावे पूजन करून जलाभिषेक केला. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव व यंदाच्या वर्षी बळीराजाला उत्तम पीक पाणी मिळू देत असे साकडे भोलेनाथाला घातले.
08 Aug, 2022 - 06:15 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
#हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्याला उपस्थित राहून हिंगोली तसेच परिसरातील नागरिक आणि शिवसैनिकांना संबोधित केले.
08 Aug, 2022 - 05:20 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ' कावड यात्रे ' मध्ये सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला.
08 Aug, 2022 - 04:01 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
नांदेड दौऱ्यांतर्गत आज गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कॉ.ऑ. क्रेडिट सोसायटच्या कॉर्पोरेट ऑफिसला भेट देऊन त्यांच्या ' सहकारस्पर्श ' या नुतन कार्यालयाचे लोकार्पण केले. तसेच भक्ती लॉन येथील मेळाव्यात नांदेड शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन केले.
08 Aug, 2022 - 02:41 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारताची महिला बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 हिने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ स्पर्धेत कॅनडाच्या बॅडमिंटनपटू मिशेल ली चा २१-१५, २१-१३ असा सहज पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तुझ्या देदीप्यमान कामगिरीचा आम्हा तमाम भारतवासियांना अभिमान आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. #CWG2022 #Badminton #Cheer4India
08 Aug, 2022 - 09:49 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
नवी दिल्ली येथे @NITIAayog नियामक परिषदेच्या सातव्या बैठकीत सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यावर भर देण्याबाबत चर्चा केली.
07 Aug, 2022 - 06:37 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
दिल्ली येथील पत्रकार परिषदेत पत्रकार बंधू भगिनींना संबोधित केले.... https://t.co/aNiQYjqWD0
07 Aug, 2022 - 01:49 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
#चक_दे_इंडिया.... भारतीय महिला हॉकी संघाने #राष्ट्रकुल_स्पर्धा_२०२२ मध्ये न्युझीलंड महिला हॉकी संघावर २-० अशी मात करून #कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.... #ChakDeIndia #CWG2022 #TeamIndia #Hockey #BronzeMedal
07 Aug, 2022 - 10:10 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ स्पर्धेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे याने युवकाने ३ हजार मीटर स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावत नवा इतिहास रचला आहे.अविनाश, आम्हा देशवासियांना तुझा सार्थ अभिमान आहे. हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा! #CWG2022 @avinash3000m
06 Aug, 2022 - 05:20 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून श्री.जगदीप धनखड़ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक शुभेच्छा.... #VicePresidentOfIndia @jdhankhar1
06 Aug, 2022 - 05:07 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल... शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार...
06 Aug, 2022 - 06:33 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागाठाणे प्रभागातील नगरसेविका सौ.धनश्री वैभव भराडकर व त्यांचे पती वैभव वराडकर यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.
05 Aug, 2022 - 05:12 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
आंध्र प्रदेश मधील तिरुमला तिरुपती बालाजी सिद्ध देवस्थानचे अध्यक्ष श्री.वाय.व्ही.सुब्बा रेड्डी यांची उपमुख्यमंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. @TTDevasthanams #Tirupati #Tirumala #TirupatiBalaji
05 Aug, 2022 - 04:01 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
ब्रिटीश उच्चायुक्त @AlexWEllis यांनी आज मंत्रालयातील दालनात माझी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र राज्यात अनेक उत्तम पायाभूत सुविधा तसेच कुशल मनुष्यबळ असल्याने येथे गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध असून इंग्लंड मधील उद्योजकांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन याप्रसंगी केले.
05 Aug, 2022 - 03:47 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
मुंबई शहर व उपनगरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जमीन व फ्री होल्ड जमिनीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण (फ्री होल्ड) प्रक्रियेसाठी काही वेळा विलंब होतो लक्षात घेत अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला
05 Aug, 2022 - 02:44 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
#सातारा पाटण येथे प्रस्तावित असलेल्या राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी महसूल विभागाने आपल्या अखत्यारीतील ३९हेक्टर जमीन तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश
05 Aug, 2022 - 02:18 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
#सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
05 Aug, 2022 - 02:10 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या प्रवासात अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते स्वेच्छेने साथ देत असून आज उल्हासनगर मनपा व जव्हार नगरपरिषदेतील नगरसेवकांनी आज युती सरकारला पाठींबा जाहीर केला.
03 Aug, 2022 - 07:15 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
#मंत्रिमंडळ_निर्णय ● नगरविकास विभाग मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा ● ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी५० ● सार्व.बांधकाम विभाग भिवंडी-कल्याण-शीळ फाटा रस्त्याच्या रुंदीकरणास वेग देणार.रू.५६१ कोटी८५ लाखाच्या खर्चास सुधारित मान्यता
03 Aug, 2022 - 01:44 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीची मंगळवारी विचारपूस केली.पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या देहबोलीतून जाणवला.आमटे कुटूंबिय व डॉक्टरांशी संवाद साधत उपचारांबाबत माहिती घेतली
03 Aug, 2022 - 09:10 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
शिवसेनेचे खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार श्री.अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर यांना आज पहाटे देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना….
03 Aug, 2022 - 08:39 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने सहभागी होत प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्याकरिता आयुष्य वेचणारे स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
03 Aug, 2022 - 07:43 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार @mphemantgodse यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
03 Aug, 2022 - 06:02 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने सहभागी होत प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्याकरिता आयुष्य वेचणारे स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
03 Aug, 2022 - 06:00 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत काल पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित विशेष बैठकीत मंडळांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. कायद्याच्या चौकटीत राहून मोठ्या उत्साहात व आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. @CPPuneCity
03 Aug, 2022 - 04:16 AM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधीस्थळी हजर उपस्थित राहून संतवर्य योगीराज शंकर महाराजांचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
02 Aug, 2022 - 06:52 PM UTC
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आज पुण्यातील मानाच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे भक्तीभावाने दर्शन घेत श्री गजाननाची मनोभावे पूजन अर्चन केले.
02 Aug, 2022 - 06:43 PM UTC

Top Retweets by @mieknathshinde

CMO Maharashtra
@CMOMaharashtra
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा #Live https://t.co/uRKPAbPsIW
09 Aug, 2022 - 05:36 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
#स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन - मुख्यमंत्री @mieknathshinde https://t.co/3Q7vIeCMV0
06 Aug, 2022 - 05:50 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतली गंभीर दखल. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
06 Aug, 2022 - 09:34 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
#ब्रिटन चे भारतातील उच्चायुक्त @AlexWEllis यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
05 Aug, 2022 - 11:39 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल - मुख्यमंत्री
30 Jul, 2022 - 06:10 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार @dadajibhuse उपस्थित होते.
30 Jul, 2022 - 06:02 AM UTC

@mieknathshinde's

Tweets

90 tweets
6 retweets
104 replies
@mieknathshinde's

Twitter Client

200 Twitter for iPhone
@mieknathshinde's

Tweet Times

@mieknathshinde's

Tweet Days


@mieknathshinde's

Retweets

3 - MahaDGIPR
3 - CMOMaharashtra
@mieknathshinde's

Replies

101 - mieknathshinde
1 - macciamumbai
1 - midc_india
1 - abpmajhatv
@mieknathshinde's

Hashtags

4 - #अण्णाभाऊ_साठे
4 - #लोकशाहीर
4 - #CWG2022
3 - #बाळ_गंगाधर_टिळक
3 - #लोकमान्य
2 - #छत्रपती_संभाजीनगर
2 - #मंत्रिमंडळ_निर्णय
2 - #सातारा
1 - #PresidentOfIndia
@mieknathshinde's

Mentions

3 - Dev_Fadnavis
2 - @iramdaskadam
2 - @AbdulSattar_99
1 - @draupadimurmupr
1 - rashtrapatibhvn
1 - Pankajamunde
1 - RNTata2000
1 - @prasadoak17
1 - @WriterPravin